६७२. वेणू
चंद्र छोटा सूर्य मोठा
दोन्ही दिसतात सारखे
खरं काय ते कळण्यासाठी
डोळे असतात बारके
इकडून तिकडे तिकडून इकडे
हलत असतो लंबक
माहित नाही कशासाठी
आकर्षित करतो चुंबक
कोण वेडा कोण शहाणा
असतो सगळा गोंधळ
प्रत्येकाचा खरा चेहरा
असतो नेहमी ओंगळ
कितीही केले प्रयत्न तरी
होत नाही दर्शन
निर्जीव कणांनाही असतं
एकमेकांप्रति आकर्षण
कोठून आलो कोठे चाललो
घेतात शोध कसून
फिरत आहेत अंतराळात
पृथ्वीवरती बसून
कशाची ना कशाची तरी
लागते सगळ्यांनाच आस
अज्ञाताच्या वाटेवरती
अज्ञानाचेच भास
अनंतात विलीन होण्यासाठी
व्हावा लागतो अंत
जन्मालाही कारण असतात
दोन वेगळे जंत
एकमेकांत मिसळून अणू
बनत असतात रेणू
गीतेमध्ये श्रीकृष्णाने
वाजवलीय आपलीच वेणू
--- लबाड बोका
चंद्र छोटा सूर्य मोठा
दोन्ही दिसतात सारखे
खरं काय ते कळण्यासाठी
डोळे असतात बारके
इकडून तिकडे तिकडून इकडे
हलत असतो लंबक
माहित नाही कशासाठी
आकर्षित करतो चुंबक
कोण वेडा कोण शहाणा
असतो सगळा गोंधळ
प्रत्येकाचा खरा चेहरा
असतो नेहमी ओंगळ
कितीही केले प्रयत्न तरी
होत नाही दर्शन
निर्जीव कणांनाही असतं
एकमेकांप्रति आकर्षण
कोठून आलो कोठे चाललो
घेतात शोध कसून
फिरत आहेत अंतराळात
पृथ्वीवरती बसून
कशाची ना कशाची तरी
लागते सगळ्यांनाच आस
अज्ञाताच्या वाटेवरती
अज्ञानाचेच भास
अनंतात विलीन होण्यासाठी
व्हावा लागतो अंत
जन्मालाही कारण असतात
दोन वेगळे जंत
एकमेकांत मिसळून अणू
बनत असतात रेणू
गीतेमध्ये श्रीकृष्णाने
वाजवलीय आपलीच वेणू
--- लबाड बोका